साहित्य - दोन वाट्या बेसन, अर्धी वाटी साजूक तूप, दीड ते दोन वाट्या पिठीसाखर, अर्धा चमचा अगदी बारीक केलेली वेलची व जायफळाची पूड, थोडेसे दूध, अर्धी वाटी मैदा, दोन वाट्या कणीक, मोहनासाठी थोडे जास्त तेल, चवीपुरते मीठ.
कृती - जाड बुडाच्या कढईत आपण लाडूसाठी जसे बेसन भाजतो अगदी तसेच तुपात गुलाबी रंगावर भाजून घ्या. गॅस बंद करून बेसनावर दुधाचा हबका मारा. हलवून थंड होऊ द्या. त्यात वेलचीची पूड व पिठीसाखर मिसळून ठेवा.
कणीक व मैदा मैद्याच्या चाळणीने चाळून घेऊन मीठ घालून अर्धा तास भिजवून ठेवा. पोळी करण्यापूर्वी तेल घालून तो गोळा खूप मळून घ्या. अगदी मऊ झाला पाहिजे. हाताने छोट्या गोळ्याची वाटी तयार करून त्यात गोड बेसन भरा. सर्व बाजूंनी व्यवस्थित बंद करून हलक्या हाताने सुकी कणीक लावून लाटा. दोन्ही बाजूंनी खरपूस भाजा. ही पोळी अगदी पुरणपोळीसारखीच लागते.
Showing posts with label पोळ्या.. Show all posts

Tuesday, February 8, 2011
मसाला भाकरी
साहित्य - भाकरीचे पीठ, हिरवी मिरची, आलं- लसूण पेस्ट, कोथिंबीर व मीठ.
कृती - भाकरीचे पीठ घेऊन त्यात हिरवी मिरची- आलं- लसूण पेस्ट व मीठ, कोथिंबीर हे सर्व घालून एकत्र भाकरी करताना मळून घेतो असे मळून घ्यावे व नंतर नेहमीप्रमाणे भाकरी करावी. लहान मुले भाकरी खाण्याचा कंटाळा करतात; पण उन्हाळ्यात ज्वारी थंड असते. अशी भाकरी केल्यास मुले आनंदाने खातात. भाकरीबरोबर लोणी किंवा तूप घेऊन खावे.

मणगने
गोव्यात कडबु पुरणपोळी पेक्षा सोपा असा मणगने हा पदार्थ बनवला जतो. लग्नप्रसंगी हा पदार्थ केल जातो.
साहित्य- एक वाटी तांदुळ, अर्धी वाटी हरभरा डाळ, ओले खोबरे-किसलेले अर्धी वाटी व थोदेसे तुकडेही, एक चम्चा खसखस, कजु तुकडे, एक वाटी गुळ,वेलची पावडर.
कृती- हरभरा डाळ स्वछ धुऊन दहा मिनिटे भिजत ठेवावी. तांदुळ धुऊन घ्यावेत. दोन्ही मिळुन जाड बुडाच्या मोठ्या पातेलात शिजत ठेवावे. डाळ नीट शिजली की त्यात गुळ, खोबरे, खसखस, काजुचे तुकडे घालावेत. अर्धा चमचा साजुक तुप घालावे. वेलची पूड घालावी.
हा पदार्थ पातळच असतो. करण्यास अत्यंत सोपा व पुरवठ्याला उत्तम.

रवा गुळाची साटोरी
साहित्य : दिड वाटी कणिक, १ वाटी मैदा, अर्धी वाटी बारीक रवा, ४ टेस्पुन तुपाचे / रीफाईंड तेलाचे मोहन, तांदळाचे पीठ.
सारण : १ वाटी बारीक रवा, १ वाटी किसलेले सुके खोबरे, १ वाटी जाडसर दळलेली कणीक किंवा बेसन, २ वाटी चिरलेला गुळ,, २ टेस्पुन भाजुन खसखस पुड, वेलची जायफळ पुड.
कृती : प्रथम साजुक तुपावर रवा अगदी खमंग भाजवा, मधुन मधुन पाण्याचा शिपका द्यावा म्हणजे फुलेल. नंतर तो बाजुला ठेवुन त्याच कढईत तुपावर कणिक वा बेसन खमंग भाजुन घ्यावे. खोबरेही गुलाबीसर भाजावे. रवा, खोबरे, कणीक / बेसन एकत्र करुन त्यात खसखस वेलची जायफळ पुड मिसळावी. गुळात चमचाभर पाणी घालुन तो वितळवुन घ्यावा. जरा कोमट असताना त्यात इतर सर्व साहित्य घालावे अन एकजीव करुन ठेवावे
पारीसाठी कणिक, रवा, मैदा एकत्र करुन त्यात मीठ व मोहन घालुन घट्ट मळावे. तासाभराने पुन्हा मळुन त्याचे पेढ्याएवढे गोळे करावे. अन सारण भरुन उंडा करुन नेहेमीप्रमाणे साटोर्या कराव्यात. या डीप फ्राय केल्या तरी चालतात, अन टिकतात.

खजुराची साटोरी
साहित्य : दीड वाटी मैदा, अर्धी वाटी बारीक रवा, अर्धी वाटी कणिक, ३ टेस्पुन पातळ तुप, चिमुट मीठ, पाणी वा दुध, तांदळाचे पीठ, तुप.
सारण : ४०० gm बीनबियांचा खजुर, अर्धी वाटी पिठीसाखर, पाव वाटी मिल्क पावडर, अर्धी टीस्पुन वेलची पुड, पाव वाटी डेसिकेटेड कोकोनट.
कृती : खजूर धुवुन कापडावर पसरुन कोरडा करावा. नंतर बारीक चिरुन मिक्सरमध्ये वाटुन घ्यावा. त्यात इतर सर्व सारणाचे साहित्य मिसळुन एकजीव करुन ठेवावे.
रवा, मैदा, कणिक, तुप व मीठ एकत्र करुन पाण्याने वा दुधाने घट्ट मळावे. तासभर झाकुन परत मळुन नेहेमीप्रमाणे साटोर्या कराव्यात. यात डेसिकेटेड कोकोनट ऐवजी अक्रोड पुड पण घातली तरी चालते

काजूची साटोरी
साहित्य : दिड वाटी मैदा, अर्धी वाटी बारीक रवा, चिमुट मीठ, दुध, तांदळाचे पीठ, ३ टेस्पुन गरम तुपाचे मोहन, तुप.
सारण : दिड वाटी काजूची पुड, अर्धी वाटी खवा, २ टेस्पुन घट्ट साय, दिड वाटी पिठीसाखर, पाव टीस्पुन दुधात भिजवलेले केशर, वेलची जायफळ पुड.
कृती : कढईत खवा कोरडाच परतावा. त्यात काजुची पुड घालुन थोडे परतावे व लगेच आंचेवरुन उतरावे. मिश्रण गार झाले की त्यात वेलची जायफळ पुड, पिठीसाखर, केशर अन साय घालुन मळुन एकजीव करावे.
पारीसाठीचे साहित्य एकत्र मळुन पोळीपेक्षा घट्ट भिजवावे. तासाभराने त्याचे उंडे करुन त्यात सारण भरुन नेहेमीप्रमाणे साटोर्या कराव्यात. मात्र या डीप फ्राय करु नयेत. तव्यावर आधी शेकुन मग कडेने साजुक तुप सोडुन तळाव्यात

खव्याची साटोरी
साहित्य : १ वाटी बारीक रवा, १ वाटी मैदा, २ टेस्पुन कडकडीत तुपाचे मोहन, चिमुट मीठ, दुध, तांदळाचे पीठ, तुप.
सारण : पाव किलो खवा, अर्धी वाटी रवा, १ टेस्पुन भाजलेली खसखस, २ वाटी पिठीसाखर, वेलदोडा जायफळ पुड, तुप.
कृती : साजुक तुपावर रवा मधुन मधुन दुधाचा शिपका मारुन खमंग भाजुन फुलवुन घ्यावा. तो बाजुला ठेवुन त्याच कढईत खवा तुप सुटेपर्यंत कोरडाच भाजावा. दोन्ही कोमट झाले की त्यात खसखस पुड, पिठीसाखर अन वेलची जायफळ पुड घालुन एकजीव करावे.
रवा व मैदा एकत्र करुन त्यात तुपाचे मोहन व मीठ घालुन दुध किंवा पाण्याने घट्ट भिजवावे. तासाभराने कुटुन मळुन त्याचे लहान गोळे करावे त्यात सारणाचा दिडपट गोळा भरुन उंडा तयार करावा वा हातावर तो थापुन चपटा करावा. हा तयार उंडा तांदळाच्या पीठावर पुरी एवढा लाटुन प्रम्थम नॉनस्टीक तव्यावर मंद आंचेवर दोन्ही बाजुनी कोरडा शेकावा, डाग पडु देऊ नये. नंतर लगेच ही साटोरी तुपात तळावी. टिकण्यासाठी करायची असल्यास डीप फ्राय करावी. २ ते ३ दिवसात संपवायची असेल तर तुप सोडुन shalow fry केली तरी चालते.

सांजोरी
साहित्य : १ वाटी बारीक रवा, १ वाटी गुळ, १ वाटी मैदा किंवा कणीक, तुप, १ चमचा खसखस, वेलदोडा अन जायफळ पुड.
कृती : रवा तुपात भाजावा त्यावर २ ते ३ चमचे गरम पाणी शिंपडुन परत भाजावा. दुसरीकडे गुळ किसुन त्यात १ चमचा पाणी घालून मंद आंचेवर ठेवा.
त्यात वेलदोडा पुड अन जायफळ पुड व खसखशीची भाजुन पुड घाला.
नंतर भाजलेला रवा कोमट झाला की या गुळाच्या मिश्रणात घालुन घोटा. अन त्याचे छोटे छोटे उंडे म्हणजे गोळे करुन ते डब्यात भरुन रात्रभर फ्रीझमध्ये ठेवा.
दुसर्या दिवशी सकाळी मैदा किंवा कणिक किंचीत मीठ व तेल घालुन घट्ट भिजवा. कणिक असेल तर ती २ दा चाळुन घ्या. सारणाच्या गोळ्या एवढिच मैदा वा कणकेची गोळी करुन त्यात सारण भरुन छोट्या पुर्या लाटा. gas वर तवा गरम करुन ही पुरी म्हणजे साटोरी दोन्ही बाजुने जरा गुलाबीसर शेकुन घ्या अन मग तुपात तळा. गार झाली की डब्यात भरा. आधी शेकुन काढली की जास्त दिवस टिकते.

मखमलपूरी
१ वाटी मैदा
अर्धा टी स्पून हळद
तेल डीप फ़्रायिन्ग साठी
सुके खोबरे किसून १ वाटी
साखरेचा एकतारी पाक
० मैद्यात हळद ताकुन कणिक भिजवल्या
प्रमाणे पिठ भिजवून घेणे.
० साखरेचा एकतारी पाक करायला ठेवा.
० भिजवलेल्या पिठाच्या लहान (अगदि लहान
नाही)पुर्या करून त्या तेलात तळुन घ्या,
तळताना मात्र तेलातच अर्ध्या दूमडा
(अर्ध गोलाकार).
० पूरि तळाल्याचा अन्दाज येताच ति पूरी
गरम गरम असतानाच गरम पाकात टाका
आणि २-३ मिनिटा नन्तर एका ताटात काढुन
ठेवा. त्या पूरि वर किसलेले सुक खोबर
पेरा.
० ह्या पुर्या ५ ते ६ तासानी कडक होतिल
(किन्वा दुसर्या दिवशी), मग मखमलपूरी
खाण्यास तयार. चहा सोबत ह्या पूर्या
ऊतकृष्ट लागतात
अर्धा टी स्पून हळद
तेल डीप फ़्रायिन्ग साठी
सुके खोबरे किसून १ वाटी
साखरेचा एकतारी पाक
० मैद्यात हळद ताकुन कणिक भिजवल्या
प्रमाणे पिठ भिजवून घेणे.
० साखरेचा एकतारी पाक करायला ठेवा.
० भिजवलेल्या पिठाच्या लहान (अगदि लहान
नाही)पुर्या करून त्या तेलात तळुन घ्या,
तळताना मात्र तेलातच अर्ध्या दूमडा
(अर्ध गोलाकार).
० पूरि तळाल्याचा अन्दाज येताच ति पूरी
गरम गरम असतानाच गरम पाकात टाका
आणि २-३ मिनिटा नन्तर एका ताटात काढुन
ठेवा. त्या पूरि वर किसलेले सुक खोबर
पेरा.
० ह्या पुर्या ५ ते ६ तासानी कडक होतिल
(किन्वा दुसर्या दिवशी), मग मखमलपूरी
खाण्यास तयार. चहा सोबत ह्या पूर्या
ऊतकृष्ट लागतात
मिसी रोटी
साहित्य:
१ कप बेसन पीठ
१ कप गव्हाचे पीठ
२ ते ३ चमचे तुप
१ चमचा कसूरी मेथी
मीठ चविनुसार
अर्धा चमचा तिखट
अर्धा चमचा जीर
चिमुटभर हळद आणि हिंग
कृती:
सगळ साहित्य मिसळुन घ्या.त्यात पाणी घालुन कणिक मळुण घ्या.
नन्तर कणिक झाकुन साधारण अर्ध्या तासासाठी ठेवा.
नंतर कणकेचे गोळे करुन साधारण चपातीपेक्षा थोडस जाड लाटा.
तव्यावर तेल किंवा तुप लावुन छान खरपूस भाजुन घ्या

झटपट धपाटे
कणिक आणि हवे असल्यास थोडे बेसन, चिरलेला कांदा, भरड कुटलेले थोडे धणे आणि आवडत असेल तर जीरे, लाल तिखट किंवा चिरलेली हिरवी मिरची, थोडी हळद, चवीला मीठ आणि बारीक चिरलेली भरपुर कोथिंबीर, लहान चमचाभर तेल.
पद्धत १: सगळे साहित्य एकत्र करुन थोडे थोडे पाणी घालुन भाजणीच्या थलिपीठा सारखे मळायचे.
प्लस्टिकवर थालिपीठासारखे थापायचे.
मधे एक भोक पाडुन तव्यावर तेलात वा तुपात दोन्ही बाजुनी खरपुस भजायचे.
लसणीच्या चटणी आणि लोण्याबरोबर भरपुर चापायचे

तांदळच्या भाकर्या
१ कप तांदळाचे पीठ विकतचे.( चांगले सुवासिक तांदूळ भिजवून, सावलीत सुकवून दळणे वगैरेचा स्कोप नाही!)
१.२५ कप पाणी
१ टी स्पून तेल
.५ टी स्पून मीठ.
एका स्टील च्या पातेल्यात पाणी, तेल आणि मीठ उकळले. मग गॅस मंद करून एक हाताने पीठ घातले आणि आणि दुसर्या हाताने( लाकडी उलथण्याने) भराभर ढवळले. मग गॅस वरून बाजुला घेऊन परत चांगले ढवळले. ओंजळ्भर कोमट पाण्याचा शिपका मारून, झाकून अगदी मंद गॅस वर ठेवले दोन मिनिटे. झाकणात थोडे थंड पाणी घातले. बरोबर दोन मिनिटांनी परातीत काढून वाटीच्या बुडाने मळले. मग थोडे हाताळण्याजोगे कोमट झाल्यावर आठ भाग करून, ओल्या कापडाखाली ठेवले आणि एकेक गोळा परत मळून, पिठी लाऊन पोळपाटावर पातळ लाटल्या आणि पाणी वगैरे न लावता दोन्ही बाजूनी तव्यावरच भाजल्या. पहिल्या ५-६ एकदम गोर्यापान, डाग न पडू देता भाजल्या. शेवटच्या दोन तीन नवर्याच्या फरमाइशीनुसार लहान मुलांच्या गालावर freckles असतात तशा दिसेपर्यंत भाजल्या.

Sunday, February 6, 2011
दोडक्याचे पराठे
दोडक्याला ज्या बाहेरच्या बाजुने शिरा असतात त्या फ़ारच खरखरीत असतात.बरेच जण त्याची चटणी करतात. पण त्याचेच पराठे पण करता येतात. ह्या शिरा पचनाला मदत करतात.कणकीमधे या शिरा किसून घालव्यात. चवी प्रमाणे तिखट, मीठ, ओवा,हळद,जिरे धणे पूड,हिन्ग,थोडा दही,तेलाच मोहन घालुन कणीक भिजवावी आणी तासाभराने पराठे लाटावेत.बर्याच जणाना खरखरीत पणामुळे ही भाजी आवडत नाही.त्यानी शिरानचे असे पराठे करून पहवेत. ह्या शिरा खरच खूप पोउश्टिक असतात
भोपळ्याचे पराठे
भोपळा किसून घ्यावा.त्या मधे आल लसूण मिरचीची पेस्ट घालावी हिन्ग, हळद जिरेपूड आणी मीठ लावून अर्धा पाऊण तास ठेवावे. भोपळ्याला पाणी सुटेल. त्या पाण्यातच भिजेल एवढी कणीक भिजवावी आणी लगेच पराठे लाटावेत.जर लाटताना सैल वाटली कणीक तर थोड अजून ईठ मिसळावा आणी मळून घ्यावा. भोपळ्याचा सुन्दर केशरी रन्ग येतो या पराठ्याला
मुळ्याचे पराठे
मुळा खिसुन पाणि पिळुन घ्यावा
धणे जीरे पावडर करुन घ्यावी
जराशा तेलावर हळद,मोहरी घालुन फोडणि करुन त्यात हा मुळा घालावा.
एक वाफ आली की धणे जीरे पावडर, तिखट्/वाटलेली मिर्ची,,कोथिंबिर मिठ,थोडीशी साखर घालुन चान्गल मिक्स करावे
नंतर त्यात अंदाजानी डाळीचे पिठ घालावे..फार कोरडे कींवा फार पातळ होऊ देऊ नये..... साधारण पराठ्यात भरता येईल असे सारण असावे...
नन्तर ईतर कोणत्याही पराठ्यासारखा भरुन पराठा करावा
हे सारण गार झाल्यावरच पराठे करायला घ्यावेत

चक्रि पराठा
कणकेत जरा जास्त पातळ तुप आणि जिरे घालुन घट्टसर मळुन घ्यावे.याचा जरा मोठा गोळा घेवुन जाड्सर पोळि लाटावि...पोळिला पातळ तुप लावावे..थोडे पिठ भुरभुरुन...जपानि पंख्याप्रमाणे (उलट्सुलट)घडि घालत एकावर एक घडि घालत जावि..
सर्वात वरच्या घडिला तुप लावुन दुमडलेले पदर आत येतिल अशी दिवाळितल्या भुईचक्राप्रमाणे वळवुन घ्यावेऽसे ३ - ४ चक्र तयार झाले कि मग पहिला लाटायला घ्यावा मध्यमच लाटुन शेकावे. शेकताना तुप सोडुन रुमालाने दाबुन खुस खुशित करत जावे..
जेवढ्या घड्या जास्त तेव्हदे जास्त पदर सुटतात. चक्राचि गुंडाळि जमलि असेल तर..पराठ्यावर चक्राकार अनेक पदर सुटतात.जरा वेळ ख़्हावु काम आहे.पण चव खुप सुंदर लागते.आलु-मटर,किंवा तत्सम पंजाबी भाज्या किंवा लोणच,भरित याबरोबर पण सुंदर लागतात.

मिश्र पराठा
1 soppa prakar paratha banavayala...
ji kahi bhaji urali asel tila mixer madhe barik karayacha ani tyat thoda tikhat , mith, garam masala, add karayacha. mag te sarva mishran normal pithamadhe bhijavayacha..
ani paratha banavayacha..
tumhi 2 /3 bhjya pan mix karu shakata..
khoop mast chavista lagata..
किसमीस पराठा.
साहित्य : हवे तेवढे काजू, बदाम, बेदाणे,मनुका, अक्रोड हे सर्व घेऊन बारीक वाटावे. त्यापुर्वी बदाम गरम पाण्यात भिजवुन साल काढुन घ्यावेत.
कृती : कणकेत हे वाटलेले मिश्रण,अर्धा चमचा तेल, थोडा मैदा, मीठ चिमुटभर, १ टीस्पुन पीठीसाखर घालुन थोडे दुध अन पाणी एकत्र करुन त्याने पीठ भिजवुन त्रिकोणी लाटुन तुप वरुन सोडुन भाजावेत, मुलानाही आवडतील.
पनीर पराठा रोल
साहित्य :-
१०० ग्रॅम पनीर(बारिक कुस्करलेले)
१ छोटा कांदा(बारिक चिरलेला)
३ बटाटे उकडुन कुस्करलेले
मिठ, हळद
१ टोमॅटो बारिक कापलेला
कणिक मळलेली
तेल,कांद्याची पात
कृती :-
कढईत तेल तापवुन कांदा लालसर होईपर्यंत परतावा. त्यात आल लसुण मिरचीची पेस्ट टाकावी आणि टोमॅटो मिक्स करुन हळद मिठ(चवीपुरते) आणि पनीर टाकावे.
हे सर्व वाफ़ेवर शिजवुन घ्यावे. दुसरिकडे कणकेची लाटी करुन त्यात उकडलेला बटाटा भरुन पराठे करावेत.
प्रत्येक पराठ्यात वरिल मिश्रण भरुन त्याचे रोल करुन त्याला कांद्याच्या पातीने बांधुन गरम गरम सर्व्ह करावेत.
साॅस किंवा चटणी बरोबर छान लागतिल

टोमटो पराठे
साहित्य-रेडिमेड टोमटो प्युरी,कणीक,ओवा, तीळ, तिखट, आवडत असल्यास थोडी लसूण पेस्ट व चवीप्रमाणे मीठ.
वरील सर्व साहित्य एकत्र करून पीठ मळावे व नेहेमीच्या पराठ्याप्रमाणे पराठे करावेत. लाल रंगाचे पराठे दिसतात
Subscribe to:
Posts (Atom)