Tuesday, February 8, 2011

सांजोरी

साहित्य : १ वाटी बारीक रवा, १ वाटी गुळ, १ वाटी मैदा किंवा कणीक, तुप, १ चमचा खसखस, वेलदोडा अन जायफळ पुड.

कृती : रवा तुपात भाजावा त्यावर २ ते ३ चमचे गरम पाणी शिंपडुन परत भाजावा. दुसरीकडे गुळ किसुन त्यात १ चमचा पाणी घालून मंद आंचेवर ठेवा.

त्यात वेलदोडा पुड अन जायफळ पुड व खसखशीची भाजुन पुड घाला.

नंतर भाजलेला रवा कोमट झाला की या गुळाच्या मिश्रणात घालुन घोटा. अन त्याचे छोटे छोटे उंडे म्हणजे गोळे करुन ते डब्यात भरुन रात्रभर फ्रीझमध्ये ठेवा.

दुसर्‍या दिवशी सकाळी मैदा किंवा कणिक किंचीत मीठ व तेल घालुन घट्ट भिजवा. कणिक असेल तर ती २ दा चाळुन घ्या. सारणाच्या गोळ्या एवढिच मैदा वा कणकेची गोळी करुन त्यात सारण भरुन छोट्या पुर्‍या लाटा. gas वर तवा गरम करुन ही पुरी म्हणजे साटोरी दोन्ही बाजुने जरा गुलाबीसर शेकुन घ्या अन मग तुपात तळा. गार झाली की डब्यात भरा. आधी शेकुन काढली की जास्त दिवस टिकते.

मखमलपूरी

१ वाटी मैदा
अर्धा टी स्पून हळद
तेल डीप फ़्रायिन्ग साठी
सुके खोबरे किसून १ वाटी
साखरेचा एकतारी पाक

० मैद्यात हळद ताकुन कणिक भिजवल्या
प्रमाणे पिठ भिजवून घेणे.

० साखरेचा एकतारी पाक करायला ठेवा.

० भिजवलेल्या पिठाच्या लहान (अगदि लहान
नाही)पुर्‍या करून त्या तेलात तळुन घ्या,
तळताना मात्र तेलातच अर्ध्या दूमडा
(अर्ध गोलाकार).

० पूरि तळाल्याचा अन्दाज येताच ति पूरी
गरम गरम असतानाच गरम पाकात टाका
आणि २-३ मिनिटा नन्तर एका ताटात काढुन
ठेवा. त्या पूरि वर किसलेले सुक खोबर
पेरा.

० ह्या पुर्‍या ५ ते ६ तासानी कडक होतिल
(किन्वा दुसर्‍या दिवशी), मग मखमलपूरी
खाण्यास तयार. चहा सोबत ह्या पूर्‍या
ऊतकृष्ट लागतात

मिसी रोटी

साहित्य:
१ कप बेसन पीठ
१ कप गव्हाचे पीठ
२ ते ३ चमचे तुप
१ चमचा कसूरी मेथी
मीठ चविनुसार
अर्धा चमचा तिखट
अर्धा चमचा जीर
चिमुटभर हळद आणि हिंग

कृती:

सगळ साहित्य मिसळुन घ्या.त्यात पाणी घालुन कणिक मळुण घ्या.
नन्तर कणिक झाकुन साधारण अर्ध्या तासासाठी ठेवा.
नंतर कणकेचे गोळे करुन साधारण चपातीपेक्षा थोडस जाड लाटा.
तव्यावर तेल किंवा तुप लावुन छान खरपूस भाजुन घ्या

झटपट धपाटे

कणिक आणि हवे असल्यास थोडे बेसन, चिरलेला कांदा, भरड कुटलेले थोडे धणे आणि आवडत असेल तर जीरे, लाल तिखट किंवा चिरलेली हिरवी मिरची, थोडी हळद, चवीला मीठ आणि बारीक चिरलेली भरपुर कोथिंबीर, लहान चमचाभर तेल.

पद्धत १: सगळे साहित्य एकत्र करुन थोडे थोडे पाणी घालुन भाजणीच्या थलिपीठा सारखे मळायचे.
प्लस्टिकवर थालिपीठासारखे थापायचे.
मधे एक भोक पाडुन तव्यावर तेलात वा तुपात दोन्ही बाजुनी खरपुस भजायचे.
लसणीच्या चटणी आणि लोण्याबरोबर भरपुर चापायचे

तांदळच्या भाकर्‍या

१ कप तांदळाचे पीठ विकतचे.( चांगले सुवासिक तांदूळ भिजवून, सावलीत सुकवून दळणे वगैरेचा स्कोप नाही!)
१.२५ कप पाणी
१ टी स्पून तेल
.५ टी स्पून मीठ.

एका स्टील च्या पातेल्यात पाणी, तेल आणि मीठ उकळले. मग गॅस मंद करून एक हाताने पीठ घातले आणि आणि दुसर्‍या हाताने( लाकडी उलथण्याने) भराभर ढवळले. मग गॅस वरून बाजुला घेऊन परत चांगले ढवळले. ओंजळ्भर कोमट पाण्याचा शिपका मारून, झाकून अगदी मंद गॅस वर ठेवले दोन मिनिटे. झाकणात थोडे थंड पाणी घातले. बरोबर दोन मिनिटांनी परातीत काढून वाटीच्या बुडाने मळले. मग थोडे हाताळण्याजोगे कोमट झाल्यावर आठ भाग करून, ओल्या कापडाखाली ठेवले आणि एकेक गोळा परत मळून, पिठी लाऊन पोळपाटावर पातळ लाटल्या आणि पाणी वगैरे न लावता दोन्ही बाजूनी तव्यावरच भाजल्या. पहिल्या ५-६ एकदम गोर्‍यापान, डाग न पडू देता भाजल्या. शेवटच्या दोन तीन नवर्‍याच्या फरमाइशीनुसार लहान मुलांच्या गालावर freckles असतात तशा दिसेपर्यंत भाजल्या.

मिश्र डाळींचा पराठा

मिश्र डाळींचा पराठा.
मुंबईत हल्ली मिश्र डाळी बाजारात मिळतात. अर्थात घरीहि अश्या मिसळुन ठेवता येतील. तुर, मुग, मसुर आणि ऊडिद डाळी मिसळुन घ्याव्यात. त्यात थोडे पिवळे वा हिरवे मुग घातले तरी चालतील. ऊडदाची डाळ जरा कोरडीच भाजुन घेतली तर छान.
या डाळी घोळुन धुवुन घ्याव्यात. स्वच्छ पाणी निघेस्तो धुवाव्यात. मग दोन तीन तास भिजत ठेवाव्यात. नीट भिजल्या कि निथळुन त्याला हळद व हिंग चोळुन, पाणी न घालता, कुकरच्या डब्यात आठ मिनिटे ऊकडुन घ्याव्यात. ( याची दाल फ़्रायहि करता येते ) मग थंड झाले कि लसुण व हिरवी मिरची घालुन मिक्सरमधुन काढाव्यात. त्यात मीठ, हिंग व लाल तिखट घालावे. दोन कप पुरण असेल तर अर्धा चमचा सुंठ पावडर घालावी. हे मिश्रण खुपच कोरडे होते. त्यात ओलेपणासाठी, एक लहान कांदा किसुन घालावा. सारण जरा जास्त तिखटच हवे. तसेच त्यात अर्धा चमचा साखरहि घालावी.

एवढ्या प्रमाणासाठी दोन कप कणीक घ्यावी. त्यात मुठभर कोथिंबीर बारिक करुन घ्यावी. किंचीत हळद, हिंग, मीठ व तेल घालुन चपातीपेक्षा थोडी घट्ट कणीक मळावी.
सारनाचे सहा भाग करुन, कणकेचे ऊंडे करुन त्यात सारण भरावे. हे ऊंडे काळजीपुर्वक करावे, कारण पराठे लाटताना फ़ुटायची शक्यता असते.
तांदळाच्या पिठीवर जाडसर पराठे लाटुन, मंद आचेवर तेल सोडुन दोन्हीकडुन भाजुन घ्यावेत. खाली ऊतरुन वर तुप लावावे व वरुन चाट मसाला शिवरावा. दह्याबरोबर खावेत

Auto Draft