Showing posts with label कालवन....प्रकार.. Show all posts
Showing posts with label कालवन....प्रकार.. Show all posts

Saturday, February 5, 2011

भेंडीचा झणझणीत रस्सा

साहित्य - पाव कि. कोवळी भेंडी, १ कांदा, १ टोमॅटो, एक लसूण गड्डी, ४ ते ५ हिरव्या मिरच्या, ओले खोबरे कीस १ वाटी, रिफाइंड दोन वाट्या, मीठ, साखर, तिखट, कोथिंबीर, कढीपत्ता, पावभाजी मसाला, काजू, बेदाणे अर्धी वाटी.



कृती - प्रथम भेंडी धुऊन पुसून घ्यावी. त्याचा टोकाचा दांडा आणि देठ काढून टाकावे. कढईत रिफाइंड घालून भेंडी गुलाबीसर तळून घ्यावी. कोथिंबीर, कांदा, टोमॅटो, अर्धी वाटी खोबरे, कोथिंबीर, लसूण, जिरे कढईत घालून वाफवून घ्यावे. मिक्‍सरमध्ये घालून पेस्ट करावी. कढईत रिफाइंडमध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, लाल तिखट घालून फोडणी तयार करावी. त्यात वरील पेस्ट घालावी. त्यात ४ ते ५ वाट्या पाणी घालावे. चवीनुसार पावभाजी मसाला, तिखट, मीठ, साखर घालून मिश्रण एकजीव करावे. त्यात तळलेल्या भेंड्या घालाव्यात. पाच मिनिटे झाकण ठेवून मग गॅस बंद करावा. पोळी, पुरी व रस्सा खाण्यासाठी घेताना त्यावर खोबरे, बेदाणे, काजूचे तुकडे घालावे. रस्सा चिकट होत नाही. झणझणीत रस्सा छान लागतो.

 

सारु ..High Protein Nutritious डाळीचा प्रकार

२ वाट्या तांदूळ,


१ वाटी मुग डाळ,
खालील डाळी प्रत्येकी मुठी मुठी घ्यायच्या,
मसुर डाळ,
चणा डाळ,
उडीद डाळ,
३ मोठे चमचे अक्खे धणे,
३ मोठो चमचे जिरे,
तिखट लाल मिरच्या(चविप्रमाणे),
हिंग शेवटी टाका न भाजता,
७ ते ८ काळी मीरी दाणे,
२ चमचे मेथी,
दोन लहान चमचे सुखे खोबरे( हो लहानच चमचे घ्या नाहीतर ते सांबार होईल).
सुकलेला कढीपत्ता,

वरील सर्व वेगळे वेगळे भाजुन काढायचे नी छान बारीक वाटायचे (कोरडेच).
दBआबंद भरुन ठेवायचे.

काल मी कंटाळले होते, तेव्हा जराशी ही पुड घ्यायची, tomato बारीक वाटुन घ्यायचे,
छान फोडणी द्यायची मोहरी,ताजा कढीपत्ता,चिंच, कोथींबीर, मग एक वाटी चांगलेच पाणी टाकुन त्यात tomato juice टाकायचा, उकळी आली की ही पॉवडर टाका. मोजुन दहा मिनीटात मस्त protein युक्त डाळ तयार, पाहीजे तर सांबार म्हणुन वापरा भाज्या टाकुन,
पाहीजे तर भरपुर चिंचेचा जुइcए टाकुन चिंच रसम, नाहीतर tomato सारु म्हणुन.
नाहीतर नुसते गरम भातावर पण छान लागते.
कंटाळा आला असेल तर कोण ऑफ़ीस वरुन येवुन डाळ उकडा,शिजवा, फोडणी द्या करतय.

करुन पहा, खुप चविष्ट लागतो हा प्रकार, Tomato नाही टाकला तरी चालते. पाहीजे तर गुळ टाका.

हे खुप आळते नंतर, शुद्ध तूपाची फोडणी छान लागते.

पुड थोडीच घेतली नी दोन वाट्या पाणी टाकले तरी छान होते

 

Palak/ ambadi/ aalu

1) Palak/ ambadi/ aalu ek judi ghya, chhaan dhuvun chirun ghya
2) Cooker madhe bhajit thode pani ghalun shijva
3) Bhaji cooker madhe shijtana tyasobat vegalya bhandyat thode kachche shengdane/ chanyachi daal etc pan bhijvun shijvayala theva
3) Bhaji cooker baher kadhun, pani vegale kadha and pani thevun dya (taku naka)
4) Bhajit thode besan (ek judila 3 tbspoon besan) ghalun changali ghota (ravine ghusala--patkan kaam hote)
5) Kadhait 3 tbspoon (calorie conscious asala tar 1 suddha pure) telat mohari, hing, lasun pakalya (7-8), laal mirchya (3-4), methiche dane (1/4 tspoon) ghala. Mag ghotaleli bhaji ghala.
6) Tyat shijlele dane, daal, have tar khobaryache kaap ghala
7) Paani (magashi vegale kadhalele and have tar ajun suddha)
8) Meeth and gool ghala (ithe tumchi khari pariksha ahe..kiti gool bhalayacha!!! Dnt worry, chav ghet ghet gool taka, barobar hoil) Shivay lakshat thevanyachya goshti mhanaje
a) aluchi bhaji asel tar ambat chuka/ chich lagate. Chinch ghalanyapoorvi panyat bhijvun kolun ghalavi lagate
b) Palak asel tar chinch lagate (ek barik limba evadhi)
c) Ambadichya bhajit NO chinch and jara jasta gool lagato
9) Bhaji chhaan mand gas var premane ukala.
10) Mood asel tar var khovalela naral ghala

पोपटीच्या दाण्यांची झणझणीत आमटी

पावशेर पोपटीचे दाणे, 1-2 लाल टोमॅटो, १ मोठा कांदा, आले, लसुण, हिरवी मिरची अन कोथिंबीर याचे वाटण साधारण पाऊण वाटी, भरपुर तेल, लाल तिखट



कृती : फोडणीत नेहेमीपेक्षा जास्त तेल घेऊन ते गरम झाल्यावर त्यात हिंग जीरे मोहरी हळद सर्व टाकुन बारीक चिरलेला कांदा अन टॉमेटो टाकुन परतावे.
नंतर आले, लसुण, कोथिंबीरीचे वाटण टाकुन चांगले परतावे. नेहेमीपेक्षा जास्त तिखट ( अर्थात सोसले तर ) अन चवीपुरते मीठ टाकुन हलवुन घ्यावे.

अन लगेच त्यात गरम उकळते पाणी आपल्याला ज्या प्रमाणात रस्सा पातळ हवाय त्या प्रमाणात टाकावे. अन मग पोपटीचे दाणे त्यात टाकुन भांड्यावर झाकण ठेवावे.

नंतर दाणे पुर्ण शिजल्यावर गॅस बंद करुन भांडे खाली उतरवुन झाकुन ठेवावे. वाढण्यापूर्वी ओला नारळाचा किस अन चिरलेली कोथिंबीर पेरावी. अन सोबत एक लिंबाची फोड द्यावी. चोखंदळ खाणारे लिंबाचा वापर करतीलच.

याच पद्धतीने ओले हरभरे, वाटाणे यांची आमटी करता येईल.

 

मिरवणी

मिरवणीत सगळेच घटक उष्ण पडणारे असल्यामुळे ही आमटी खूप थंडित किंवा पावसाळ्यात खातात.


अर्धा डोल सुकं खोबरं
८-१५ मिरे (किती तिखट चालेल यावर अवलंबून)
५ लसूण पाकळ्या
एक मध्यम आकाराचा कांदा (न घेतल्यास चालतो)
मीठ
१ आमसुल
तुप किंवा तेल १छोटा चमचा
जीरं पाव चमचा
कृती:
* खोबरं गॅसवर भाजून घ्यावं वरून किंचित काळं होईपर्यंत. घरात स्मोक डीटेक्टर असणार्‍यांनी विकतचा खोबर्‍याचा चुरा तव्यावर खरपूस परतून घ्यावा.
* कांदा घेणार असाल तर तो देखील सोलून त्याला " + " अश्या खाचा देऊन भाजून घ्यावा.
* मिरं, खोबरं (भाजून तुकडे करून), कांदा (परत एकदा, नसला तरी चालतो) लसूण आणि मीठ एकत्र करून मिक्सरमधून अगदी बारिक वाटून घ्यावं. वाटताना पाणी शक्य तितकं कमी घालून.
* तेल जीर्‍याची फोडणी करून त्यावर अगदी अर्धा मिनिट वाटण परतावं.
* यावर दोन कप उकळीचं पाणी घालून अमसूल घालून ४-५ मिनिटं उकळू द्यावं
चवदार मिरवणी तयार.
भाताशी खायला उत्तम! यात हवं असल्यास शिजलेल्या तुरीच्या किंवा मुगाच्या डाळीचा गोळा घालावा. (त्याबरोबर जरासा गुळ पण). तसंच अंड खाणार्‍यांना यात उकडलेलं अंड घालता येईल. मिरवणीला उकळी येताना त्यात अंड फोडून पण टाकतात.
** खोबरं, कांदा भाजताना फार जाळल्या जाऊ नये. नाहीतर कडवटपणा येतो.

 

डाळ्मेथी

१ वाटी तुरीची डाळ व पाउण वाटी मेथीची निवडालेली भाजी म्हणजे हिरवी पाने एकत्र कुकर म्ध्ये शिजवावी.



नंतर चान्गले घोटून त्यात तिखट, मीट, मसाला, चवीपुरता गूळ घालावा. थोडे पाणी घालून सरसरीत करून घ्यवे. नेहेमीप्रमाणे लसणाची फ़ोडणी करून त्यावर हे तयार केलेले मीश्रण टाकावे व छान उकळू द्यावे

 

उडीदमेथी

२ टेबलस्पून उडीद डाळ मंद आंचेवर कोरडीच गुलाबी होईपर्यंत तव्यावर परतावी. नंतर थोडसं तेल घालून लाल होईपर्यंत परतावी. त्यांत पांच - सहा धन्याचे व काळ्या मिर्‍याचे दाणे, सुक्या मिरच्या (तिखट कमीजास्त आवडीप्रमाणे) परताव्या. शेवटी सपाट टीस्पून मेथीचे दाणे घालून परतावे व तवा उतरवून त्यांतच गार होऊ द्यावे. ह्या मसाल्याची मिक्सरमधे सुकी पावडर करून घ्यावी. अर्ध्या नारळाचं वेगळं वाटण करावं.



दोन आंबट कैर्‍यांच्या साल काढून मोठ्या फोडी करून घ्याव्या. तेलांत मोहरी, कढीपत्ता, हिंग व हळद घालून फोडणी करावी, त्यांत कैर्‍यांचे तुकडे, उडीदमेथीची वाटलेली सुकी पावडर, पाणी, मीठ व गूळ घालून कैर्‍या शिजेपर्यंत उकळावें. शेवटी खोबर्‍याचं वाटण घालून पांच मिनिटें मंद उकळत ठेवावें. (दाटपणा जसा आवडेल त्याप्रमाणांत पाणी घालावे, पण उडीदमेथी नंतर उडीदाच्या पावडरीने दाट होतेच.)
मीठ, गुळ व कैरीच्या आंबटपणाचे रसायन जमले की उडीदमेथी चांगली होते. आदल्या दिवशीची शिळी व मुरललेली उडिदमेथी जास्त चविष्ट लागते

 

दाल माखनी -

५ भाग काळे उडिद, १ भाग राजमा - एकत्र करुन रात्री भिजत घालावे. त्याचे पाणी बदलुन ते direct कुकर मधे घालावे. साधारण १० भाग पाणी घालावे. त्यात १ चमचा आले खिसुन घालावे. आवडत असेल एखादी हिरवी मिरची घालावी. ३ शिट्ट्या मध्यम आचेवर आणि शेवटच्या २ शिट्या बारीक आचेवर कराव्यात.



कुकर्ची वाफ़ गेली कि पाणी किती आहे ते पहावे खुप कमी असेल तर मग दाणे बुडतिल इतके पाणी घालावे आणि परत शिजायला ठेवावे.

कांदा बारीक चिरावा, टोमॆटो बारीक चिरावा. हे सर्व लोण्यावर भाजावे. गरम मसाला, मीठ, घालुन चांगले परतावे.
हे सर्व उकळणाया डाळीमधे घालावे. आणि ते मिश्रण नीट घाटुन घ्यावे - नीट मिक्स झाले पाहिजे.

मसाला भाजताना तेलावर भाजुन वरुन लोणी घातले तरी चालते.

 

मुगाचे कढण

साहीत्य :


मुगाची डाळ २५०ग्रम, एका नारळाचे दुध, गुळ, वेलचीपुड

कृती :
प्रथम मुगाची डाळ कध इत थोडीशी लालसर होइपर्यंत भाजुन घ्यावी. नंतर ती धुवुन घ्यावी ( कधी कधी डाळीला पावडर लावलेली असते म्हणुन ) . नंतर डाळीत अंदाजे एक कप पाणी घालुन ती शिजवुन घ्यावी. डाळ शिजल्यावर नारळाच्या दुधात गुळ घालुन ते मिश्रण त्यात ओतावे. उकळी आणुन ते व्यवस्थीत शिजवावे. नन्तर वेलची पुड घालावी

 

मुगाच्या डाळीचे वरण

२ मुठी मुगाची डाळ कुकर मधे शिजवुन घ्यावी. मग त्यात १ वाटी आम्बट ताक मिसळाव. मीठ घालुन हे मिश्रण गरम करुन घ्याव. वरुन मोहरी, लसुण, लाल्-मिरच्या, हळद यान्ची खमन्ग फ़ोडणी द्यावी. पचायला हलक अनि चवीला उत्तम अस हे वरण


 

MajhGharkul

Tools ‹ MajhGharkul — WordPress.

दाल फ्राय


१ वाटी तुर डाळ, २ टॉमेटो, ३ ते ४ हिरव्या मिर्च्या, ४ ते ५ सुक्या लाल मिर्च्या, १ इंच आले, ५ ते ६ लसुण पाकळ्या, २ कांदे, कोथिंबीर, कढिपत्ता, २ चमचे लोणी / बटर, १ कांद्याची पात.



कृती : प्रथम डाळ कुकरमध्ये शिजवुन घ्या. टॉमेटो आले, लसुण बारीक चिरा. एका पातेल्यात नेहेमीप्रमाणे मोहरी, जीरे, कढिपत्त्याची फोडणी करुन घ्या. त्यात बारीक चिरलेले आले,लसुण अन हिरवी मिर्ची टाका. नंतर सुक्या मिर्च्या टाका. व चिरलेला कांदा घालुन परता, नंतर टॉमेटो टाकुन मंद आंचेवर झाकण ठेवुन शिजवा. २ मिनिटानी शिजवुन घोटलेली डाळ, चिरलेली कोथिंबीर व मीठ घाला. अगदी थोडे पाणी घाला. चवीपुरती साखर वा गुळ घाला.

सर्व्ह करताना वरुन बटर घालुन अन कांद्याची पात त्याच्या कांद्यासकट बारीक चिरुन घाला.


 

सांबर

Sahitya: Turdal, Bhajya(jya havya asatil tya), Phodaniche sahitya. Chinchecha Kol


Kukar madye sadharan ek mothi vati tur dal shijavun ghene. Ekikade Limba evadi chinch garam panyat bhijavun thevane (nidan aardha tas tatri). 1 midium kanda barik chirun ghene. You can add any veg. that you want. Like ghevada, vange, bhopla, batata ect. South Indian lok lal mula dekhil ghaltat. Kinwa jar lahan goti kande milalyas te pan ghaltat.
Telavar nehamichi phodani (mohari, jeere, hing, halad kadipala ect) karun kanda paratun ghene. tyat bhajya takun paratne. Chinchecha kol va kuthalahi sambar masala va agadi thode pani ghalun tyat bhajya shijavun ghene. Mag turdal va have tevhade pani ghalun changlya ukalya aanane.Mitha ghalane.
Kahi lok varun phodani detat. Pan aadhich phodani dilyas parat phodanicha tras vachto va bhajya chaglya shijatat.
Kahi lok thode dhane, Methya, lal mirchi, harabara dal, suke khobare bhajun gheun barik karun ukali aalyar tyat ghaltat.

 

shiplyache bhaji

sahitya:- shimple have titke, ale-lasun paste,halad, thikhat, dane powder,
mith 

kruti:-pratham shimple safe karun ghyave mug tyat ale lasun paste havi titke takave
thikhat mith dane powder halad ghalvi praman avdi prmane.(shimple saf
kartana je pani sutate te tkun dyve kiva kashattari vaparave)
bhajiche pitha bhijavun tyat shimple budaun talave. garm garm chhan lagtat