Sunday, February 6, 2011

पुरण पोळ्या

१. डाळ शिजवायला लावताना त्यात किंचीत हळद आणि तेल घालायचं. हळदी ने छान रंग येतो आणि तेलाने नरमपणा येतो.


२. ग़ूळ चांगला किसून घ्यावा. माझं प्रमाण तरी जेवढी डाळ तेवढाच गूळ असं आहे.
३. पुरण शिजलं की नाही बघण्यासाठी त्यात उलथनं घालून बघावं. ते उभं राहिलं की पुरण शिजलं असं समजावं.
४. कणीक चांगली तिंबली जाणं हे सगळ्यात महत्वाचं.
५. भारतात नुस्त्या गव्हाची कणीक असते तर थोडा मैदा घालावा त्यात. पण इथे मी मैदा घालत नाही. माझ्या अनुभवाप्रमाणे golden temple नेहेमीच्या पोळ्यांसाठी खास नसलं तरी पुरणपोळ्या त्याच्या छान होतात. त्यात already मैदा असतो.
६. आधी नेहेमीसारखी कणीक घेऊन त्यात तेल, पाणी घालून भिजवून ठेवायची.
७. साधारण तासाभराने त्यात मीठ घालून, नेहमीपेक्षा सैल कणीक मळावी. कणीक मळताना तेलाचा सढळ हाताने वापर करावा. ४ बोटांनी उलट्या बाजूने दाब देत जावा. कणीक मळताना ती पोळपाटावर चांगली आपटून घ्यायची. तार सुटली पाहिजे. आणि अशी छान मळलेली कणीक भान्ड्यात तेल घालून त्यात बुडवून ठेवावी. कणकेचा गोळा पुर्ण भिजेल एवढं तेल पाहिजे.
७. पोळी लाटताना जेवढा कणकेचा उंडा त्यापेक्षा दीडपट आकाराचा पुरणाचा उंडा घ्यावा. दुप्पट घेतला तर उत्तम. मग तांदळाच्या पीठीवर पोळी हलक्या हाताने लाटावी. पोळी लाटताना लाटणे सगळीकडे समान फ़िरायला हवे आणि अजिबात जोर देऊ नये. तवा खुप तापवू नये. मध्यम आंच असावी. पोळी हाताने टाकायला भीती वाटत असेल तर लाटण्यावर गुंडाळून ती तव्यावर हळु हळू उलगडावी. मी तरी भाजताना तूप टाकत नाही. दोन्हिकडून छान गुलाबी शेकली गेली की खाली काढल्यावर भरपूर तुप घालून वाढावी.

 

No comments:

Post a Comment