Sunday, February 6, 2011

घडीच्या पोळ्या?

मी कणकेचा गोळा आधी हातावरच गोल करुन घेतो. मग त्याला चापट करतो आणि दोन बोटानी तेल पसरवितो. नंतर पहिली घडी घालतो. परत एकदा तेल लावतो आणि तो अर्धा भाग चापट करतो. नंतर दुसरी घडी घालतो. तर आता तिचा आकार चतकोर झाला. मग कडा बंद करतो आणि पिठ लावून पोळी लाटतो. ती काही केल्या गोल होत नाही. त्रिकोणी होते. पोळी लाटून झाली की मग परत एकदा तेल लावतो आणि तेल लावलेला भाग ताव्यावर टाकतो. दुसरा वरचा भाग कोरडा होत आला की वरची बाजू खाली करतो व काठाने तेल पसरवितो. खालची दुसरी बाजू होत आली की पहिली बाजू परत एकदा ताव्यावर शेकतो. ती झाली की पोळी काढून ठेवतो. मी कापडाने पोळीच्या कडा दाबत नाही. एकून ३ वेळा मी पोळी तव्यावर भाजतो. पहिली बाजू, २ री बाजू, परत एकदा १ली बाजू. same like फ़ुलके पण सगळे काही ताव्यावर.



माझी पोळी कडक येते शिवाय कडा फ़ुटतात. पदर नीट सुटत नाहीत. तेल नक्की कधी आणि किती लावायचे हे काही कळत नाही. पोळी गोल होण्याकरिता काही उपाय सांगू शकेल का कुणी?

पोळ्यांसाठी काही खास तावा लागतो का? मी Teflon चा non stick तावा वापरतो.

 

No comments:

Post a Comment