Sunday, February 6, 2011

खव्याची पोळी

साहित्य : २ वाटी खवा, २ वाट्या पिठीसाखर, १० ते १२ वेलदोड्यांची पूड, ३ वाट्या कणिक, अर्धी वाटी तेल, तांदळाची पिठी, चिमुटभर मीठ, अर्धी वाटी बेसन( हरबरा डाळीचे पीठ)कृती : खवा हाताने मोकळा करुन तांबूस रंगावर भाजून घ्यावा. डाळीचे पीठ( बेसन) तूप घालून बदामी रंगावर भाजावे. कोमट झाले की खवा, बेसन, पिठीसाखर एकत्र करुन चांगले मळावे. वेलदोडा पूड घालून परत मळावे.

कणिक बारीक चाळणीने चाळून घ्यावी. त्यात नेहेमीपेक्षा जास्त तेल व चवीपुरते मीठ घालावे. नेहेमीच्या कणकेपेक्षा थोडी घट्टच भिजवावी. पोळी करतांना १ गोळ्याच्या २ लाट्या कराव्यात. त्या गोळ्यापेक्षा मोठी गोळी खवा मिश्रणाची घ्यावी. लाट्या लाटुन घ्याव्यात अन मग एका लाटलेल्या लाटीवर मध्ये खव्याची गोळी चपटी करुन ठेवावी. त्यावर कणकेची दुसरी गोळी ठेऊन कडा दाबुन घ्याव्यात. अन पातळसर लाटून गुलाबी रंगावर भाजावी.

टिप्स : खव्यात बेसन भाजून घातल्याने सारण म्हणजे खवा उंड्याच्या बाहेर येत नाही.

तेल सगळ्या कणकेत फिरवुन घालावे. मुटका वळून पहावे की मग समजावे की ते व्यवस्थीत लागले गेलेय, म्हणजे पोळी खुसखुशीत होते.

कणकेचा अन सारणाचा मऊपणा सारखा असावा. एक सैल अन दुसरे घट्ट असे असू नये.

पोळी सगळीकडून एकसारखी पातळ लाटली जावी.

 

No comments:

Post a Comment