Sunday, February 6, 2011

रोटी

रोटी ही पराठे किंवा चपाती पेक्षा करायला सोपी आहे आणि पटकन होते.


रोटी ची कणिक फार सैल नको. थोडी घट्टच हवी.
मध्यम आकाराचे गोळे आधी करुन घ्यावेत. फार लहान, किंवा फार मोठे नकोत. हे गोळे झाकुन ठेवावेत. नंतर मध्यम जाडीची रोटी लाटावी, साधारण १ mm जाडी असावी.

रोटी भाजताना :-
साहित्य :- तवा, दोन रुमाल.

तवा पुर्ण प्रक्रियेत मध्यम आचेवरच थेवावा. तवा कितपत गरम हवा हे अंदाजाने कळेलच, पण अंदाज येइपर्यंत त्यावर थोडे तेल लाववे. भाजीसाठी घेतो तसे नाही, ज्याला तेलाच हात पुसणे म्हणतात ना तसे. ( हा हात तवा थंड असतानाच पुसावा. ). तेलाचा थोडा वास यायला लागला की तवा रोटी भाजन्यासाठी तयार झाला असे समजावे. हे तेल फक्त पहिल्या रोटी साठी लावावे. दुसरी रोटी लगेच भाजु नये. आधीची रोटी भाजुन झाली की स्टॉप वॉच वर पाच सेकंद सेट करावा, म्हणजे पाच सेकंद थांबावे.
आता लाटलेली रोटी या तव्यावर टाकावी. लगेच उलथण्याची घाई करु नये. तोपर्यंत एका जाड रुमालाची चौपदरी घडी करावी. आता रोटी आपोपाच तवा सोडत असेल, तिचा पांढरट रंग बदलुन तांबुस झाला असेल, तर उलथावी. अशाच पद्धतीने दुसर्‍या बाजुने देखील भाजुन घ्यावी. अजुन आपली रोटी पुर्ण भाजलेली नाही, फक्त शेकलेली आहे. चौपदरी रुमालाने कडेवर दाबत दाबत ही रोटी भाजुन घ्यायची आहे. रुमाल रोटी भाजण्यसाठी वापरायचा आहे, बोटे भाजण्यासाठी नाही हे लक्षात ठेवायचे आणि त्या बेताने कडा भजुन घ्यायच्या. जर व्यवस्थित, सगळ्या बाजुनी सारख्या जाडीची लाटली गेली असेल, तर छान फुगते.

आता रोटी भाजुन झाली की दुसर्‍या रुमालाने झाकुन ठेवायची. असे केल्याने रोटी थंड झाली तरी वातड होत नाही. खाताना त्यावर तुप लावुन खायचे.

अधुन मधुन कणिक मळाताना डाळीचे पिठ मिसळावे.
ही रोटी चुकुन शिल्लक राहिलेच तर दुसर्‍या दिवशी काला नमक लावुन दह्या बरोबर खावी

 

No comments:

Post a Comment