Saturday, February 5, 2011

दुधी भोपळ्याची जीर्‍या मिर्‍याची कढी...

साहित्य : १ किलो दुधी भोपळा, अडिच वाट्या पाणी, २ टीस्पुन जीरे अन १ टीस्पुन काळ्या मिर्‍याची भाजुन ताजी पुड, १ ते २ टेस्पुन तांदळाची पिठी, मीठ, २ चमचे तेल. हळद आवडीनुसार.



कृती : दुधी धुवुन साले काढुन बारीक चिरुन घ्या, त्यात थोडेच पाणी घालुन मऊ शिजवुन घ्या. मग डावाने वा चमच्याने नीट घोटा.
या शिजलेल्या दुधीत थोडे तेल, जीरेमिरी पुड,मीठ घाला. तांदळाची पिठी थोड्या पाण्यात कालवुन या मिश्रणात घाला, नीट हलवा अन थोडे पाणी घालुन परत २ उकळी द्या. गरमच वाढा.
ही सुपाप्रमाणे असल्याने नुसतीसुद्धा चालते अन पोळी वा भात कशाबरोबरही चालते. पचनास हलकी असल्याने आजारे माणसासही चालेल.

 

No comments:

Post a Comment