Sunday, February 6, 2011

दोडक्याचे पराठे

दोडक्याला ज्या बाहेरच्या बाजुने शिरा असतात त्या फ़ारच खरखरीत असतात.बरेच जण त्याची चटणी करतात. पण त्याचेच पराठे पण करता येतात. ह्या शिरा पचनाला मदत करतात.कणकीमधे या शिरा किसून घालव्यात. चवी प्रमाणे तिखट, मीठ, ओवा,हळद,जिरे धणे पूड,हिन्ग,थोडा दही,तेलाच मोहन घालुन कणीक भिजवावी आणी तासाभराने पराठे लाटावेत.बर्याच जणाना खरखरीत पणामुळे ही भाजी आवडत नाही.त्यानी शिरानचे असे पराठे करून पहवेत. ह्या शिरा खरच खूप पोउश्टिक असतात


 

No comments:

Post a Comment