Saturday, February 5, 2011

उडीदमेथी

२ टेबलस्पून उडीद डाळ मंद आंचेवर कोरडीच गुलाबी होईपर्यंत तव्यावर परतावी. नंतर थोडसं तेल घालून लाल होईपर्यंत परतावी. त्यांत पांच - सहा धन्याचे व काळ्या मिर्‍याचे दाणे, सुक्या मिरच्या (तिखट कमीजास्त आवडीप्रमाणे) परताव्या. शेवटी सपाट टीस्पून मेथीचे दाणे घालून परतावे व तवा उतरवून त्यांतच गार होऊ द्यावे. ह्या मसाल्याची मिक्सरमधे सुकी पावडर करून घ्यावी. अर्ध्या नारळाचं वेगळं वाटण करावं.दोन आंबट कैर्‍यांच्या साल काढून मोठ्या फोडी करून घ्याव्या. तेलांत मोहरी, कढीपत्ता, हिंग व हळद घालून फोडणी करावी, त्यांत कैर्‍यांचे तुकडे, उडीदमेथीची वाटलेली सुकी पावडर, पाणी, मीठ व गूळ घालून कैर्‍या शिजेपर्यंत उकळावें. शेवटी खोबर्‍याचं वाटण घालून पांच मिनिटें मंद उकळत ठेवावें. (दाटपणा जसा आवडेल त्याप्रमाणांत पाणी घालावे, पण उडीदमेथी नंतर उडीदाच्या पावडरीने दाट होतेच.)
मीठ, गुळ व कैरीच्या आंबटपणाचे रसायन जमले की उडीदमेथी चांगली होते. आदल्या दिवशीची शिळी व मुरललेली उडिदमेथी जास्त चविष्ट लागते

 

No comments:

Post a Comment