Saturday, February 5, 2011

क्रिस्पी चिली कॊर्न

मक्याचे दाणे १ वाटी, ३ चमचे मैदा, १ चमचा तांदुळ पिठी, मिठ, जिरे-धने पुड, अगदी बारिक चिरलेली कोथिंबिर, सिमला मिरची १, हिरवी मिरची १-२, पातीचा कांदा आणि पात पातळ चिरुन(चायनिजला घेतो त्याप्रमाणे), लसुण-आलं बारिक चिरुन(पेस्ट करु नये, खाताना दातात तुकडे आले पाहिजेत), तळण्यासाठी तेलमक्याच्या दाण्यांत मीठ, धने-जीरे पुड, कोथिंबीर, मैदा, तांदुळ पिठी घालुन किंचित पाणी घालुन घावे.(जास्त पातळ करु नये, अंगाबरोबर असावे) , कढईत तेल तापवुन मक्याचे दाणे डीप फ्राय करावेत
दुसर्या पॆनमध्ये थोड्या तेलावर आलं-लसुन, कांदा पात, सिमला मिरची, हिरव्या मिरचीचे उभे पातळ काप परतुन घ्यावेत, कोथिंबिर घालावी आणि गॆस बंद करावा मग तळलेले कॊर्न घालुन मिसळुन घ्यावं आणि गरमा गरम सर्व्ह करावं

 

No comments:

Post a Comment