Saturday, February 5, 2011

पोपटीच्या दाण्यांची झणझणीत आमटी

पावशेर पोपटीचे दाणे, 1-2 लाल टोमॅटो, १ मोठा कांदा, आले, लसुण, हिरवी मिरची अन कोथिंबीर याचे वाटण साधारण पाऊण वाटी, भरपुर तेल, लाल तिखट



कृती : फोडणीत नेहेमीपेक्षा जास्त तेल घेऊन ते गरम झाल्यावर त्यात हिंग जीरे मोहरी हळद सर्व टाकुन बारीक चिरलेला कांदा अन टॉमेटो टाकुन परतावे.
नंतर आले, लसुण, कोथिंबीरीचे वाटण टाकुन चांगले परतावे. नेहेमीपेक्षा जास्त तिखट ( अर्थात सोसले तर ) अन चवीपुरते मीठ टाकुन हलवुन घ्यावे.

अन लगेच त्यात गरम उकळते पाणी आपल्याला ज्या प्रमाणात रस्सा पातळ हवाय त्या प्रमाणात टाकावे. अन मग पोपटीचे दाणे त्यात टाकुन भांड्यावर झाकण ठेवावे.

नंतर दाणे पुर्ण शिजल्यावर गॅस बंद करुन भांडे खाली उतरवुन झाकुन ठेवावे. वाढण्यापूर्वी ओला नारळाचा किस अन चिरलेली कोथिंबीर पेरावी. अन सोबत एक लिंबाची फोड द्यावी. चोखंदळ खाणारे लिंबाचा वापर करतीलच.

याच पद्धतीने ओले हरभरे, वाटाणे यांची आमटी करता येईल.

 

No comments:

Post a Comment