Saturday, February 5, 2011

कढीगोळ्यांची कृति

काबुली चणे भिजवुन रवाळ वाटुन घ्यावेत. त्यात वाटतानाच लसुण व मिरचि घालावी. मीठ घालावे. पाणी शक्यतोवर वापरु नये. मग हलक्या हाताने गोळे करुन तळुन घ्यावेत. (याचे कच्चे पीठच त्यादिवशी पाहुण्यानी खाल्ले) विरघळतील असे वाटले तर त्यात थोडी कणीक घालावी.


अर्धा किलो दहि घुसळुन घ्यावे. त्याला हिरवी मिरची वाटुन लावावी. थोडेसे तांदळाचे नाहीतर मक्याचे पीठ लावावे. चवीप्रमाणे मीठ व साखर घालावी.
एका बटाट्याच्या पातळ चकत्या करुन त्या सोनेरी रंगावर तळुन घ्यावा. एक कांदा ऊभा पातळ चिरुन तोहि सोनेरी रंगावर तळुन घ्यावा. मग मिरीदाणे थोडेसे ठेचुन घ्यावेत व फ़ोडणीत ते दाणे व दालचिनीचे तुकडे घालावेत. त्यावर ताक घालावे व ढवळुन मंद आचेवर शिजवावे. ऊकळु नये. कांदे बटाटे घालावेत. पिठाचा कच्चट वास गेला कि ऊतरावे.
थोडे निवल्यावर आयत्यावेळी गोळे अलगद घालावेत. कढी परत गरम करु नये.

 

No comments:

Post a Comment