Saturday, February 5, 2011

दाल फ्राय


१ वाटी तुर डाळ, २ टॉमेटो, ३ ते ४ हिरव्या मिर्च्या, ४ ते ५ सुक्या लाल मिर्च्या, १ इंच आले, ५ ते ६ लसुण पाकळ्या, २ कांदे, कोथिंबीर, कढिपत्ता, २ चमचे लोणी / बटर, १ कांद्याची पात.कृती : प्रथम डाळ कुकरमध्ये शिजवुन घ्या. टॉमेटो आले, लसुण बारीक चिरा. एका पातेल्यात नेहेमीप्रमाणे मोहरी, जीरे, कढिपत्त्याची फोडणी करुन घ्या. त्यात बारीक चिरलेले आले,लसुण अन हिरवी मिर्ची टाका. नंतर सुक्या मिर्च्या टाका. व चिरलेला कांदा घालुन परता, नंतर टॉमेटो टाकुन मंद आंचेवर झाकण ठेवुन शिजवा. २ मिनिटानी शिजवुन घोटलेली डाळ, चिरलेली कोथिंबीर व मीठ घाला. अगदी थोडे पाणी घाला. चवीपुरती साखर वा गुळ घाला.

सर्व्ह करताना वरुन बटर घालुन अन कांद्याची पात त्याच्या कांद्यासकट बारीक चिरुन घाला.


 

No comments:

Post a Comment