Sunday, February 6, 2011

गाजराचे पराठे

३ ते ४ गाजरे, लसुण २ पाकळ्या, कणिक नेहेमीप्रमाणे व्यक्तींनुसार, थोडा मैदा, लाल मिरच्या, तुप, मीठ.कृती : गाजराचा धुवुन तुकडे करुन रस काढावा. लाल मिर्च्या अन लसुण वाटुन घ्यावे. मिर्च्या ऐवजी तिखट वापरायचे असेल तर लसणाची नुसती पेस्ट करावी किंवा खुप बारीक करावा.

कणकेत मैदा,चमचाभर तेल अन मीठ मिक्स करावे, वाटलेला लसुण अन मिर्ची किंवा अर्धा टीस्पुन तिखट घालावे अन गाजराचा रस या कणकेच्या मिश्रणात घालुन पीठ भिजवुन नेहेमीप्रमाणे वरुन तुप सोडुन परोठे करावेत.

गाजराच्या रसा ऐवजी किस डायरेक्ट पीठात घातला तरी चालेल

 

No comments:

Post a Comment