Saturday, February 5, 2011

भज्यांची आमटी

कांद्याची शिळी म्हणजे नरम पडलेली भजी चार वाट्या, असतील तर अर्धा नारळ, चार पाच लाल मिरच्या, अर्धा कच्चा कांदा हे सगळे बारिक वाटुन घ्यायचे. त्यात हळद घालायची.


तेलाची हिंग मोहरी घालुन फ़ोडणी करायची. त्यात अर्धा कांदा बारिक चिरुन घालायचा. तो परतला कि वरचा वाटलेला मसाला घालायचा. तीन चार कोकमे घालायची. मीठ घालुन उकळु द्यायचे. उकळुन मसाला शिजला कि त्यात भजी घालायची. एक उकळी आणुन गॅस बंद करायचा. वरुन कोथिंबीर घालायची.
सुक्या खोबर्‍याचा मसाला घालुन, गोळ्यांची आमटी करतो तश्या पद्धतीने केली तर जास्त चांगली लागेल. भजी मात्र आयत्यावेळीच घालायची, नाहीतर विरघळतात.

 

No comments:

Post a Comment