Saturday, February 5, 2011

कटाची आमटी

फोडणी साठी - तेल, कढीपत्ता, हिंग, हळ्द, जिरे, मोहरी.


इतर साहित्य - गोडा मसाला, मिठ, लाल तिखट, ओले खोबरे-कोथींबीर वाटण, थोडा चिंचेचा कोळ, थोडे पुरण.

कट, वाटण, चिंच, पुरण, मिठ, तिखट, मसाला एकत्र करुन उकळायला ठेवावे. पाणी कमी जास्ती बघावे. कारण जसजशी आमटी उकळते तसे पाणी घालावे लागते. सधारण १५ ते २० मिनिटे उकळले की मग त्यात खमंग फोडणी घालावी आणि एक उकळी आणावी.

 

No comments:

Post a Comment