Sunday, February 6, 2011

गुळाच्या पोळ्या

साहित्य : २ वाटी किसलेला गुळ, पाव वाटी सुके खोबरे, अर्धी वाटी तीळाचे कुट, १ चमचा खसखस, अर्धी वाटी बेसन, १ मोठा चमचा तेल, कणिक हवी तेवढी, चिमुट भर मीठ, १ टीस्पुन वेल दोडे पुड.कृती : बेसन तेलात फेस येईपर्यंत खमंग भाजावे, म्हणजे बेसनाच्या लाडुला भाजतो तसे. फार तपकिरी वा लाल करु नये. मग ते gas वरुन उतरवुन कढईत बेसन गरम असतानाच किसलेला गुळ घालावा अन सारखे करावे. बेसनाच्या आधीच सुके खोबर्‍याचा किस अन खसखस वेग वेगळी कोरडीच भाजुन घ्यावी. अन त्यांची पुड करावी. तीळ पण कोरडे भाजुन त्यांची पुड करावी. वेलदोड्याची खसखशी बरोबरच मिक्सरमध्ये पुड करावी.

हे सर्व पुड मिश्रण बेसन अन गुळात एकत्र करावे. अन चांगले मळावे, पाहिजे तर पुसटसर तेलाच्या हाताने मळावे. अन डब्यात भरावे. पाहिजे तर एकदा मिक्सरमध्ये फिरवुन घ्यावे.

करायच्या वेळी कणिक कडकडीत तापलेल्या तेलाचे चमचाभर मोहन अन चिमुट मीठ घालुन घट्ट भिजवावी. नंतर करताना तिच्या २ लाट्या घेऊन छोटीसी पुरी लाटावी. एका पुरीवर मिश्रणाचा थोडा गोळा घेऊन तो त्यावर ठेवुन मग दुसरी पुरी ठेवावी. मग कडेने आधी लाटुन मग मध्ये लाटावी. म्हणजे मिश्रण सगळीकडे पसरेल. अन पातळ लाटावी. मग तव्यावर खमंग भाजावी. ह्या पोळ्या बर्याच दिवस टिकतात. अन तयार मिश्रण पण फ्रिझमध्ये रहाते

 

No comments:

Post a Comment