Sunday, February 6, 2011

उकडीच्या पोळ्या

साहित्य:


१)पाव कप मैदा
२)पाव कप कणीक
३)चवीला मीठ
४)३ टेबलस्पून तेल

उकडीसाठी
५)१ कप तांदळाची पिठी. शक्यतो बासमती अगर चांगला वासाचा तांदूळ धुवून, सावलीत वाळवून त्याची केलेली पिठी असावी.
६)१ टेबलस्पून तेल
७)१ कप पाणी
८)चवीला मीठ

क्रुती:
१)मैदा व कणीक एकत्र चाळून घ्यावी.
२)मीठ व १ टेबलस्पून तेल घालून मऊ भिजवून घ्यावी.
उकड्:
१)पाणी, मीठ, तेल एकत्र करून उकळत ठेवावे. उकळी आल्यावर खाली उतरवून त्यात पिठी घालावी व मिश्रण सारखे करावे.
२)पातेले पुन्हा गॅसवर ठेऊन झाकण ठेवावे.गॅस मंद करावा.
३)दोन चार चांगल्या वाफा आल्यावर गॅस बंद करावा.
४)उकड परातीत काढून तेलाच्या व पाण्याच्या हाताने चांगली मळून घ्यावी.मऊसर करावी.
५)भिजवलेली कणीक उरलेले २ टेबलस्पून तेल व लागेल तसे पाणी घेऊन चांगली तिंबून पुरणपोळीच्या कणके सारखी भिजवावी.
६)आणी आता पुरणपोळी करतो तशीच उकड भरून पोळ्या लाटाव्यात.

 

No comments:

Post a Comment