Saturday, February 5, 2011

भेंडीचा झणझणीत रस्सा

साहित्य - पाव कि. कोवळी भेंडी, १ कांदा, १ टोमॅटो, एक लसूण गड्डी, ४ ते ५ हिरव्या मिरच्या, ओले खोबरे कीस १ वाटी, रिफाइंड दोन वाट्या, मीठ, साखर, तिखट, कोथिंबीर, कढीपत्ता, पावभाजी मसाला, काजू, बेदाणे अर्धी वाटी.



कृती - प्रथम भेंडी धुऊन पुसून घ्यावी. त्याचा टोकाचा दांडा आणि देठ काढून टाकावे. कढईत रिफाइंड घालून भेंडी गुलाबीसर तळून घ्यावी. कोथिंबीर, कांदा, टोमॅटो, अर्धी वाटी खोबरे, कोथिंबीर, लसूण, जिरे कढईत घालून वाफवून घ्यावे. मिक्‍सरमध्ये घालून पेस्ट करावी. कढईत रिफाइंडमध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, लाल तिखट घालून फोडणी तयार करावी. त्यात वरील पेस्ट घालावी. त्यात ४ ते ५ वाट्या पाणी घालावे. चवीनुसार पावभाजी मसाला, तिखट, मीठ, साखर घालून मिश्रण एकजीव करावे. त्यात तळलेल्या भेंड्या घालाव्यात. पाच मिनिटे झाकण ठेवून मग गॅस बंद करावा. पोळी, पुरी व रस्सा खाण्यासाठी घेताना त्यावर खोबरे, बेदाणे, काजूचे तुकडे घालावे. रस्सा चिकट होत नाही. झणझणीत रस्सा छान लागतो.

 

No comments:

Post a Comment