Sunday, February 6, 2011

चक्रि पराठा

कणकेत जरा जास्त पातळ तुप आणि जिरे घालुन घट्टसर मळुन घ्यावे.याचा जरा मोठा गोळा घेवुन जाड्सर पोळि लाटावि...पोळिला पातळ तुप लावावे..थोडे पिठ भुरभुरुन...जपानि पंख्याप्रमाणे (उलट्सुलट)घडि घालत एकावर एक घडि घालत जावि..


सर्वात वरच्या घडिला तुप लावुन दुमडलेले पदर आत येतिल अशी दिवाळितल्या भुईचक्राप्रमाणे वळवुन घ्यावेऽसे ३ - ४ चक्र तयार झाले कि मग पहिला लाटायला घ्यावा मध्यमच लाटुन शेकावे. शेकताना तुप सोडुन रुमालाने दाबुन खुस खुशित करत जावे..
जेवढ्या घड्या जास्त तेव्हदे जास्त पदर सुटतात. चक्राचि गुंडाळि जमलि असेल तर..पराठ्यावर चक्राकार अनेक पदर सुटतात.जरा वेळ ख़्हावु काम आहे.पण चव खुप सुंदर लागते.आलु-मटर,किंवा तत्सम पंजाबी भाज्या किंवा लोणच,भरित याबरोबर पण सुंदर लागतात.

 

No comments:

Post a Comment