Sunday, February 6, 2011

पनीर पराठा रोल

साहित्य :-


१०० ग्रॅम पनीर(बारिक कुस्करलेले)
१ छोटा कांदा(बारिक चिरलेला)
३ बटाटे उकडुन कुस्करलेले
मिठ, हळद
१ टोमॅटो बारिक कापलेला
कणिक मळलेली
तेल,कांद्याची पात

कृती :-
कढईत तेल तापवुन कांदा लालसर होईपर्यंत परतावा. त्यात आल लसुण मिरचीची पेस्ट टाकावी आणि टोमॅटो मिक्स करुन हळद मिठ(चवीपुरते) आणि पनीर टाकावे.
हे सर्व वाफ़ेवर शिजवुन घ्यावे. दुसरिकडे कणकेची लाटी करुन त्यात उकडलेला बटाटा भरुन पराठे करावेत.
प्रत्येक पराठ्यात वरिल मिश्रण भरुन त्याचे रोल करुन त्याला कांद्याच्या पातीने बांधुन गरम गरम सर्व्ह करावेत.
साॅस किंवा चटणी बरोबर छान लागतिल

 

No comments:

Post a Comment