Tuesday, February 8, 2011

तांदळच्या भाकर्‍या

१ कप तांदळाचे पीठ विकतचे.( चांगले सुवासिक तांदूळ भिजवून, सावलीत सुकवून दळणे वगैरेचा स्कोप नाही!)
१.२५ कप पाणी
१ टी स्पून तेल
.५ टी स्पून मीठ.

एका स्टील च्या पातेल्यात पाणी, तेल आणि मीठ उकळले. मग गॅस मंद करून एक हाताने पीठ घातले आणि आणि दुसर्‍या हाताने( लाकडी उलथण्याने) भराभर ढवळले. मग गॅस वरून बाजुला घेऊन परत चांगले ढवळले. ओंजळ्भर कोमट पाण्याचा शिपका मारून, झाकून अगदी मंद गॅस वर ठेवले दोन मिनिटे. झाकणात थोडे थंड पाणी घातले. बरोबर दोन मिनिटांनी परातीत काढून वाटीच्या बुडाने मळले. मग थोडे हाताळण्याजोगे कोमट झाल्यावर आठ भाग करून, ओल्या कापडाखाली ठेवले आणि एकेक गोळा परत मळून, पिठी लाऊन पोळपाटावर पातळ लाटल्या आणि पाणी वगैरे न लावता दोन्ही बाजूनी तव्यावरच भाजल्या. पहिल्या ५-६ एकदम गोर्‍यापान, डाग न पडू देता भाजल्या. शेवटच्या दोन तीन नवर्‍याच्या फरमाइशीनुसार लहान मुलांच्या गालावर freckles असतात तशा दिसेपर्यंत भाजल्या.

No comments:

Post a Comment