Saturday, February 5, 2011

दाल माखनी -

५ भाग काळे उडिद, १ भाग राजमा - एकत्र करुन रात्री भिजत घालावे. त्याचे पाणी बदलुन ते direct कुकर मधे घालावे. साधारण १० भाग पाणी घालावे. त्यात १ चमचा आले खिसुन घालावे. आवडत असेल एखादी हिरवी मिरची घालावी. ३ शिट्ट्या मध्यम आचेवर आणि शेवटच्या २ शिट्या बारीक आचेवर कराव्यात.



कुकर्ची वाफ़ गेली कि पाणी किती आहे ते पहावे खुप कमी असेल तर मग दाणे बुडतिल इतके पाणी घालावे आणि परत शिजायला ठेवावे.

कांदा बारीक चिरावा, टोमॆटो बारीक चिरावा. हे सर्व लोण्यावर भाजावे. गरम मसाला, मीठ, घालुन चांगले परतावे.
हे सर्व उकळणाया डाळीमधे घालावे. आणि ते मिश्रण नीट घाटुन घ्यावे - नीट मिक्स झाले पाहिजे.

मसाला भाजताना तेलावर भाजुन वरुन लोणी घातले तरी चालते.

 

No comments:

Post a Comment