Saturday, February 5, 2011

चिंच गुळाची आमटी ...


साहित्य: १ वाटी तूरीची डाळ, फ़ोडणीचे साहित्य, कढीपत्ता, तिखट, चिंच, गूळ, कोथिंबीर, पाणीकृति: डाळ धूवून एक तास भिजत ठेवावी. cooker मधे २ शिट्ट्या करून शिजवून घ्यावी. cooker होईपर्यंत अर्धी वाटी पाण्यात थोडी चिंच भिजत घालावी. cooker झाला की डाळ बाहेर काढून चांगली घोटावी, एकसारखी करावी. पातेल्यात/ कढईत नेहेमीसारखी फ़ोडणी करावी, त्यात कढीपत्ता घालावा, मग डाळ घालावी आणि एकत्र करावे. भिजवलेल्या चिंचेचा कोळ काढावा. म्हणजे चिंच पाण्यात कुस्करावी. तिचा गर पाण्यात उतरेल. चिंच बाहेर काढावी आणि हा कोळ डाळीत घालावा. मग डाळ हलवून घ्यावी. जितकी consistency हवी तितके पाणी घालावे. नीट mix झाले की मीठ, तिखट, काळा मसाला आणि गूळ (थोडा जास्त) घालावा. १ उकळी आली की आच मंद करावी, २ मि. ठेवून बंद करावे. वरून कोथिंबीर घालावी.

असेल तर ओले खोबरेही घालता येते. ही टीपिकल आमटीची कृती आहे. गरम गरम मस्त लागते 

No comments:

Post a Comment