Saturday, February 5, 2011

सारु ..High Protein Nutritious डाळीचा प्रकार

२ वाट्या तांदूळ,


१ वाटी मुग डाळ,
खालील डाळी प्रत्येकी मुठी मुठी घ्यायच्या,
मसुर डाळ,
चणा डाळ,
उडीद डाळ,
३ मोठे चमचे अक्खे धणे,
३ मोठो चमचे जिरे,
तिखट लाल मिरच्या(चविप्रमाणे),
हिंग शेवटी टाका न भाजता,
७ ते ८ काळी मीरी दाणे,
२ चमचे मेथी,
दोन लहान चमचे सुखे खोबरे( हो लहानच चमचे घ्या नाहीतर ते सांबार होईल).
सुकलेला कढीपत्ता,

वरील सर्व वेगळे वेगळे भाजुन काढायचे नी छान बारीक वाटायचे (कोरडेच).
दBआबंद भरुन ठेवायचे.

काल मी कंटाळले होते, तेव्हा जराशी ही पुड घ्यायची, tomato बारीक वाटुन घ्यायचे,
छान फोडणी द्यायची मोहरी,ताजा कढीपत्ता,चिंच, कोथींबीर, मग एक वाटी चांगलेच पाणी टाकुन त्यात tomato juice टाकायचा, उकळी आली की ही पॉवडर टाका. मोजुन दहा मिनीटात मस्त protein युक्त डाळ तयार, पाहीजे तर सांबार म्हणुन वापरा भाज्या टाकुन,
पाहीजे तर भरपुर चिंचेचा जुइcए टाकुन चिंच रसम, नाहीतर tomato सारु म्हणुन.
नाहीतर नुसते गरम भातावर पण छान लागते.
कंटाळा आला असेल तर कोण ऑफ़ीस वरुन येवुन डाळ उकडा,शिजवा, फोडणी द्या करतय.

करुन पहा, खुप चविष्ट लागतो हा प्रकार, Tomato नाही टाकला तरी चालते. पाहीजे तर गुळ टाका.

हे खुप आळते नंतर, शुद्ध तूपाची फोडणी छान लागते.

पुड थोडीच घेतली नी दोन वाट्या पाणी टाकले तरी छान होते

 

No comments:

Post a Comment