Sunday, February 6, 2011

कोथिंबीरिचा पराठा

साहित्य : २ वाट्या कणिक,१ वाटी बेसन, अर्धी वाटी तांदळाचे पीठ,३ टेस्पुन तेलाचे मोहन, मीठ, तिखट, हळद,हिंग.



सारण : १ मोठी जुडी कोथिंबीर, अर्धी वाटी सुके खोबरे किस, अर्धी वाटी तीळ, थोडा लिंबु रस,१ चमचा काळा मसाला, मीठ, तिखट.

कृती : सर्व पीठे एकत्र करुन त्यात तिखट, मीठ,हळद, हिंग अन तेलाचे मोहन घालुन घट्ट भिजवावे.
सारणासाठी खोबरे अन तीळ भाजुन घ्यावे. ते थोडे भरडसर वाटुन घ्यावे. नंतर सर्व एकत्र करुन तिखटसर सारण तयार करावे.
पीठाचा बेताच्या आकाराचा गोळा घेऊन त्याची पोळी लाटुन त्यावर तेलाचा हात फिरवावा व पोळीच्या अर्ध्या भागावर सारण पसरावे व दुसरा भाग त्यावर दाबुन करंजी प्रमाणे बंद करावे. थोडा लाटुन घ्यावा. अन तव्यावर तेल सोडुन दोन्ही बाजुने भाजावा.
करंजी प्रमाणे जमत वा आवडत नसेल तर कणकेच्या गोळ्यात सारण भरुन त्याचा उंडा करुन नेहेमीप्रमाणे पराठा करावा.

सुके खोबरे नाही घातले तरी चालेल अन तीळाचे प्रमण पण कमी असले तरी चालेल

 

No comments:

Post a Comment