Friday, February 4, 2011

शेंगदाण्याची चटणी!

१ कप भाजलेले शेंगदाणे
२-३ पाकळ्या लसूण (आवडीप्रमाणे कमी जास्त करावा)
१ टीस्पून जीरे
१ टीस्पून साखर
१-२ टीस्पून मीठ चवीप्रमाणे कमी जास्त करावे)
१-२ टीस्पून लाल तिखट

कृती - मिक्सरच्या भांड्यात निम्मे शेंगदाणे घालावेत त्यावर लसूण, तिखट, जिरे, मीठ, साखर घालावे.
वरून उरलेले दाणे घालावेत.
हळुहळू पल्स करत करत चटणी बारीक करावी.
भांड्यात काढून तिखट मीठ व्यवस्थीत आहे क ते पहावे.
कमी जास्त हवे असल्यास मिसळून डब्यात भरावे.

No comments:

Post a Comment