Friday, February 4, 2011

सोलाण्यांची चटणी!

हल्ली बाजारात हिरव्या हरभऱ्याच्या पेंढ्या विकायला येतात. आता ही सोलाण्यांची हिरवी चटणी करून पाहता येईल.साहित्य - एक वाटी सोलाणे, नारळाचा चव अर्धी वाटी, बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी, दोन (किंवा अधिक) हिरव्या मिरच्या, चवीप्रमाणे मीठ व साखर.

कृती - सोलाणे धुवून घ्यावेत. एका भांड्यात सोलाणे घालून त्यावर तीन-चार चमचे पाणी घालून ते कुकरमध्ये उकडून घ्यावेत. सोलाणे मऊ शिजल्यावर बाहेर काढून थंड होऊ द्यावेत. नंतर बाकीचे सर्व साहित्य व सोलाणे एकत्र करून मिक्‍सरमधून वाटून घ्यावेत.

(जरूर वाटल्यास वाटताना १-२ चमचे पाणी घालावे.) चटणी बाहेर काढल्यावर एखाद्या छोट्या कढल्यात किंवा पळीत दोन चमचे तेलाची, मोहरी व हिंग घालून फोडणी करावी व ती चटणीवर ओतावी. चमच्याने चटणी ढवळून फोडणी नीट मिसळावी. ही चटणी फ्रिजमध्ये ठेवल्यास ५-६ दिवस टिकते. सोलाणे उकडल्यामुळे चटणीत एकजीव होतात व त्यांचा उग्र वास जातो. ही चटणी भाकरीबरोबर, धिरड्याशी किंवा ब्रेडला लावून खाता येईल.

 

No comments:

Post a Comment