Friday, February 4, 2011

Sukat chi chatni!

जिन्नस


सुकट २ वाटि
टोमेटो-१
कान्दा-१
लसुण-४ पाकळ्या
हिरवि मिर्चि-१
कोथिम्बिर चिरुन
तिखट-१ चमचा
हळ्द-१ लहान चमचा
मिठ- चविनुसार
तेल- १ पळि
जिरे- १ लहान चमचा
मार्गदर्शन
१.एका पातेल्यात पाणी घ्यावे. मग त्यात सुकट टाकावी. सुकट पाण्यात अलगद तरंगेल. ति पाण्यातून काढून घ्यावी.
२.एका कढईत तेल घ्यावे.त्यात जिरे,ठेचलेला लसूण व कांदा सोनेरी होई पर्यंत परतावा. त्यात चिरलेला टोमेटो टाकावा .त्यात हळद, तिखट व मीठ टाकावे.
३.नंतर धुऊन घेतलेली सुकट टाकावी. व वाफ येईपर्यंत शिजवावी. ही चटणी सुकी बनते. वरुन कोथिंबीर टाकून सर्व करावी. हि सुकटिची चटणी तांदुलाच्या भाकरीबरोबर खुप मस्त लागते.

टीपा

सुकट पाण्यात टाकण्याचे कारण - त्यात कधी कधी माती असते.

No comments:

Post a Comment