Friday, February 4, 2011

गवारीची चटणी!

साहित्य:
एक वाटी गवार
अर्धी वाटी किसलेले खोबरे
दोन चमचे तीळ
दोन तीन हिरव्या मिरच्या
दोन चार लसणीच्या पाकळ्या
मीठ चवी प्रमाणे
पाव वाटी दाण्याचा कूट
फोडणीचे साहित्य
कृती:
जराश्या तेलावर गवार थोडा रंग बदले पर्यंत परतून घ्यावी.
यातच जरा वेळानी मीर्च्या,आणि तीळ टाकावे
गार झालं की दाण्याचा कूट आणि मीठ घालून वाटून घ्यावं.
वरून कढिपत्ता, हिंगाची फोडणी घालावी.
सोबत कान्दा कोथिंबिर असल्यास छान टेस्ट येते

No comments:

Post a Comment