Friday, February 4, 2011

Veg Soup!

साहित्य :१ टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल
अर्धा पाऊंड मटणाचे तुकडे
२ पाकळ्या लसूण बारीक चिरुन
२ Knorr चे चिकन क्यूब्ज किंवा १ कॅन चिकन स्टॉक.
१ जुडी पालक
८ कप पाणी

भाज्या- १ वाटी बटाटा फोडी करुन, तेवढीच गाजरे, सेलरी, कान्दा कापून, कोबी, किडनी बीन्स भिजवलेले.
किंवा minestrone soup साठी भाज्यांचा कॅन मिळतो किंवा त्या फ्रोजन च्या पॅक मधे मिळतात ते एक आणावे.

मीठ, मिरीपूड

कृती :

एका मोठ्या भांड्यात (stockpot) मधे ऑलिव्ह ऑइल घालून थोडा कान्दा टाकावा. लगेच मटणाचे तुकडे घालून रन्ग बदले पर्यन्त २,३ मिनिटे परतावे. मग सगळ्या भाज्या घलून ७,८ मिनिटे परतावे. मग पाणी आणि stock ( किंवा क्यूब्ज ) टाकावेत. जरा उकळी येऊ द्यावी. गाजर बटाटे जरा मऊ होत आले की गॅस बन्द करावा.

वरुन पालकाची पाने घालावी. त्यात अगदी थोडा पुदीना किंवा dill घातले तरी चालेल. मीठ आणि मीरपूड घालून हलवावे. वरुन उकडलेल्या अन्ड्याचे काप, बीट इत्यादी लावून सर्व करावे.

 

No comments:

Post a Comment