Friday, February 4, 2011

चवळीच्या देठाचे सुप!

चवळीच्या भाजीची देठे 10-12 , एक टॉमेटो, पाव चमचा मिरी पावडर, २ पाकळी लसुण, थोडे जीरे, १ चमचा तुप, 4-5 कप पाणीकृती : चवळीची भाजी निवडताना बाजुला काढलेली देठे धुवुन घ्या अन थोडी ठेचा. अन मग ही देठे चिरलेला टॉमेटो अन पाणी घालुन उकळत ठेवा. त्यात मीठ, मिरी पावडर घाला. ५ कप पाण्याचे आटुन ३ कप पाणी झाले की हे पाणी मोठ्या गाळणीने गाळुन घ्या. त्यात चांगल्या तुपाची जीरे, हिंग अन लसुण घातलेली फोडणी ओता अन गरम गरम सुप प्यायला द्या. पाहिजे तर दाटपणासाठी थोडी कॉर्नफ्लॉवरची पेस्ट घाला.

 

No comments:

Post a Comment