Friday, February 4, 2011

गाजराचे क्रीम सुप!

7-8 मध्यम लाल गाजरे, २ कांदे, अर्धा कप मलई, १ टेस्पुन चीज, २ टेस्पुन लोणी, मीठ, मिरीपावडर अन चवीपुरती साखर, ४ कप पाणी किंवा व्हेजीटेबल स्टॉक.कृती :
पातेल्यात प्रथम लोणी वितळवुन घ्यावे. गाजर आधी सोलुन त्याचे पातळ तुकडे करुन त्या लोण्यात घालावे. थोडे परतुन त्यात चिरलेला कांदा घालावा. झाकण ठेवुन थोडा वेळ शिजवा. नंतर पाणी किंवा व्हेजीटेबल स्टॉक, मीठ, साखर अन मिरी पुड घाला. उकळले की शिजलेले गाजर अन कांदा काढुन थोड्या सुपातील पाण्याबरोबर मिक्सरमध्ये फिरवा, फिरवताना एक चमचा मलई घाला.
नंतर हे मिश्रण उरलेल्या सुपात घालुन मंद आंचेवर उकळवुन घ्या. सर्व्ह करताना वरुन चिरलेली सेलरी अन किसलेले चीज घाला

 

No comments:

Post a Comment