Friday, February 4, 2011

थाई सूप!

लिम्बाचे साल आणि आले किसून ठेवायचे. लिम्बाची साल सधळ हाताने वापरा कारण ह्याचा फ़ार छान स्वाद येतो. लिम्बाचा थोडा रस काढुन ठेवा.


हिरवी मिर्ची ठेचुन किंवा थोड्या पाण्यात मिक्सर मधुन काढायची.
ब्रोकोलि गाजराचे तुकडे उकडुन घ्यायचे. खूप उकडु नयेत मऊसर होइल इतकेच करावेत. त्याचे उरलेले पाणी सूप मध्ये स्टोक म्हणुन वापरायचे आहे.
मश्रूम चे तुकडे करुन आणि कांदा आवडत असेल तर उभा चिरुन दोन्ही पाण्यात थोडा वेळ उकळुन घ्यायचे.
नारळाचे दूध, जर डब्यामधले असेल तर थोडेसे पातळ करुन घ्या. वरचे पाणीपण त्यात घालायचे आणि चांगले गरम करा.
गरम झाले की वरील सर्व पदार्थ त्यात घाला. चवीला मीठ आणि थोडी साखर घाला आणि गरम सर्व करा

 

No comments:

Post a Comment