Friday, February 4, 2011

ढोबळ्या मिरचीची चटणी!

- २ ढोबळ्या मिरच्या. (आज काल लाल आणि पिवळ्या पण मिळतात, तशा घेतल्यास रंग सुद्धा छान येतो.)
- १ वाटी डाळं (फुटाण्याची डाळ)
- ४ हिरव्या मिरच्या
- फोडणीचे साहित्य, आणि फोडणीसाठी १ लाल वाळलेली मिरची.
- चवी साठी मीठ साखर.

क्रुती:
ढोबळ्या मिरच्या मध्यम आकारात चिरुन घेउन कढईत थोड्या तेलात, थोड्याश्या परतुन घेउन वेगळ्या काढाव्यात. त्याच तेलात डाळं आणि मिरच्या सुद्धा लालसर परतून घ्याव्यात. सर्वकाही मीठ- साखर घालून मिक्सर मधून जाडसर वाटून घ्यावे. (फ़ार बारिक पेस्ट नको.) त्याला वरून मोहोरी, जीरं, हिंग आणि लाल मिरचीची फोडणी द्यावी.

ही चटणी मूग-डोश्याबरोबर छान जाते. मझ्या तेलगू मैत्रिणी अशी चटणी नेहेमी करतात.

No comments:

Post a Comment